महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर यांच्या माध्यमातून लहान मुलांना खाऊ वाटप.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष .श्री. प्रमोदजी हिंदुराव, प्रदेश सचिव श्री. आशिषजी दामले, ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री. दशरथजी तिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त मुरबाड तालुक्यातील बारवी डॅम जवळील ‘तळ्याची वाडी’ परिसरातील लहान मुलांना यावेळी
केक, चॉकलेट, बिस्कीट, कॅडबरी, कुरकुरे चिप्स यासारखे खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिपक वाघचौडे, मुरबाड शहर सेवादल सेलचे अध्यक्ष शिवाजी नवले, शहर सरचिटणीस आशिष तेलवणे वाडीतील ग्रामस्थ, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • चेतन सुधीर पोतदार (मुरबाड अपडेट्स)

Leave a comment

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started