काँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांच्या सत्काराचा “व्यर्थ नहो बलिदान” कार्यक्रम संपन्न !

मुरबाड (दि. १५) : मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी आयोजित “व्यर्थ नहो बलिदान” कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, देशसेवेतील जवान आणि काँग्रेस पक्षामध्ये काम केलेल्या जेष्ठ नेत्यांना सन्मानपत्र देवुन तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात त्यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस कार्यलय येथे स. ८:३० ला झेंडावंदन पार पडले व हुतात्मा स्तंभ ला वंदन करण्याचा कार्यक्रम पोलीस प्रभारी अधिकारी... Continue Reading →

राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाने केला कोरोना योध्यांचा पुरस्कार देऊन सत्कार…!

मुरबाड (दि.१४): कोरोना संकट काळात आपल्या प्राणांची बाजी लावून मुरबाड तालुक्यातील कोरोना विरोधी दूतांनी अभूतपूर्व कर्तव्यदक्ष भूमिका बजावली आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभाग मुरबाड शहराच्या वतीने ७५ कोरोना योध्याचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभाग मुरबाड... Continue Reading →

महाराष्ट्रातील मुरबाड मधील प्रसिद्ध म्हसा यात्रा यंदा होणार रद्द…! भाविकांमध्ये नाराजी…!

मुरबाड (दि.२५): महाराष्ट्रात गुरांच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असणार्या मुरबाडच्या म्हसा यात्रेला गुरुवारी २८ जानेवारी रोजी उत्साहात या महिन्यात प्रारंभ झाला असता मात्र कोरोनाचे कारण सांगून यंदा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून कलम १४४ लावावे अशी मागणी म्हसा ग्रामपंचायतीने यंदा केली आहे. मुरबाड-कर्जत मार्गावर मुरबाड पासून १२ किमी,तर कर्जत पासून ४२ किमी अंतरावर असणारे म्हसा हे... Continue Reading →

विजय घायवट यांची मुरबाड तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्यायच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती..!

मुरबाड (दि.१२) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा दिनी युवा नेतृत्व विजय घायवट यांच्या वर महत्वाची जबाबदारी. विजय घायवट यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका यांनी विजय घायवट यांना मुरबाड तालुका सामाजिक न्याय या महत्वाच्या कार्यकारणी वरील कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून जनसामान्य मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या युवा व्यक्तींमत्वाला संधी दिल्याने... Continue Reading →

बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी मुरबाड तालुक्यातील सर्व व्यवहार उस्पुर्तपणे बंद !

मुरबाड (दि.८): केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकरी, शेत मजुर व विविध शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारलेला आहे त्याला पाठिंबा म्हणुन मुरबाड तालुका-शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी उस्पुर्तपणे बंद पुकारला. बंदकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालुन महामहीम राष्ट्रपतींना मुरबाड तालुका तहसिलदारांना मार्फत सदरचे कायदे... Continue Reading →

गावतंटे टाळण्यासाठी पेसा ग्रा.पं. मधील अंगणवाडी पदभरती पध्दतीत बदल करावा – चेतनसिंह पवार

मुरबाड (दि.८): बुधवार दि. २ डिंसेबर २०२० रोजी महिला व बाल विकास मंत्री नामदार ॲड. यशोमती ठाकुर यांना निवेदनाव्दारे पेसा ग्रा.पं. मधील सदोष अंगणवाडी पदभरती पध्दतीमध्ये बदल करण्यासंर्दभात पर्यावरण काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी मागणी केली. सद्दस्थितीला पेसा ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाडी पदभरती मध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनीसेविका ह्या पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. सदरील... Continue Reading →

महाराष्ट्र प्रदेश प्रांतिकचे सदस्य एडवोकेट प्रमोदजी चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती.

मुरबाड (दि.२९): आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.प्रमोदजी हिंदुराव यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश प्रांतिकचे सदस्य एडवोकेट प्रमोदजी चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली याबद्दल त्यांचे मुरबाड शहर व मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वतीने सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अनेक युवकांनी प्रमोदजी हिंदुराव यांचे नेतृत्वाखाली... Continue Reading →

प्रमोद हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश !

मुरबाड (दि.२४) : मुरबाड तालुक्यात आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. रविवारी राष्ट्रवादीमध्ये अनेक महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून, महिलांकडून पक्ष संघटना बांधण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुरबाड येथील मध्यवर्ती कार्यालयात पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली अनेक... Continue Reading →

काँग्रेसच्या शिर्षनेतृत्वावर वैयक्तिक टिका केल्यास विचारमंचच्या माध्यमातुन उत्तर देणार – चेतनसिंह पवार

मुरबाड (दि.२३): २२ नोव्हेंबर २०२०, रोजी राहुल गांधी विचारमंच, महाराष्ट्र राज्यची औरंगाबाद येथेअध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये सर्व साधारण कार्यकारिणी बैठक व नियुक्ती समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन प्रदेश कार्यध्यक्ष संजय शेलार, राज्य सल्लागार ॲड. सुरेश भगत, विजुभाऊ राजपुत, यश शिंगडा आदी उपस्थित होते. यावेळी विचारमंचच्या राज्य उपाध्यक्षपदी कपिल ढोके, बालाजी नारवटे... Continue Reading →

१४,२३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी १ डिसेंबरला

मुंबई, दि. २१ (रानिआ) : राज्यभरातील १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर ७ डिसेंबर २०२० पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started