मुरबाडचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांचा लॉंग रूट मार्च..!

मुरबाड (दि.२९): मुरबाड पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळण्या साठी नवनियुक्त झालेले पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड शहरात पोलीस बल संचलन करण्यात आले. शासकीय नियमांच्या नुसार मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र पोलीस दलातील एक आक्रमक आणी गुन्हेगारी वर आपला वचक ठेवणाऱ्या प्रसाद पांढरे यांची नियुक्ती झाली... Continue Reading →

‘मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधी’ या आशयाचा समाजमाध्यमांवरील व्हायरल संदेश खोटा;विश्वास न ठेवण्याचे प्रधान मुद्रांक कार्यालयाचे आवाहन

मुंबई, दि. २४ – मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधी, शासकीय परवाना शासकीय नोकरीप्रमाणे चांगली संधी’ या मथळ्याखाली समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला संदेश हा चुकीचा आणि खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रधान मुद्रांक कार्यालयाने केले आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्ये १५० ते २०० अधिकृत मुद्रांक विक्रेता परवाना देण्याच्या संदर्भाने खोटा संदेश व्हायरल होत... Continue Reading →

गुणवत्ता वाढीस चालना देणारा ध्वजारोहणाचा “भादाणे पॅटर्न” !

मुरबाड (दि.१५): राज्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळेमध्ये झेंडावंदन व ध्वजारोहणाचा मान विद्यार्थ्यांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय मा. सरपंच संजय हांडोरे पाटील यांच्या प्रयत्नातून झाल्याने या निर्णयाचे स्वागत राज्यभरात होत असून, ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न सर्व राज्यात लागू करावा अशी मागणी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष व विविध सामजिक संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे होत आहे. या वर्षीचा स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण व ध्वजवंदन... Continue Reading →

काँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांच्या सत्काराचा “व्यर्थ नहो बलिदान” कार्यक्रम संपन्न !

मुरबाड (दि. १५) : मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी आयोजित “व्यर्थ नहो बलिदान” कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, देशसेवेतील जवान आणि काँग्रेस पक्षामध्ये काम केलेल्या जेष्ठ नेत्यांना सन्मानपत्र देवुन तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात त्यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस कार्यलय येथे स. ८:३० ला झेंडावंदन पार पडले व हुतात्मा स्तंभ ला वंदन करण्याचा कार्यक्रम पोलीस प्रभारी अधिकारी... Continue Reading →

राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाने केला कोरोना योध्यांचा पुरस्कार देऊन सत्कार…!

मुरबाड (दि.१४): कोरोना संकट काळात आपल्या प्राणांची बाजी लावून मुरबाड तालुक्यातील कोरोना विरोधी दूतांनी अभूतपूर्व कर्तव्यदक्ष भूमिका बजावली आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभाग मुरबाड शहराच्या वतीने ७५ कोरोना योध्याचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभाग मुरबाड... Continue Reading →

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या शेजारील शिडी हटवण्यात यावी मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी.

मुरबाड (दि.२८) : येत्या १९ फेब्रुवारी २०२१ रोजी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पूर्वी शिडीची जागा बदलण्यात यावी जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विना अडथळा मुरबाड करांना दररोज पाहता येईल व नतमस्तक होता होईल यासंदर्भात मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये असणाऱ्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण... Continue Reading →

महाराष्ट्रातील मुरबाड मधील प्रसिद्ध म्हसा यात्रा यंदा होणार रद्द…! भाविकांमध्ये नाराजी…!

मुरबाड (दि.२५): महाराष्ट्रात गुरांच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असणार्या मुरबाडच्या म्हसा यात्रेला गुरुवारी २८ जानेवारी रोजी उत्साहात या महिन्यात प्रारंभ झाला असता मात्र कोरोनाचे कारण सांगून यंदा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून कलम १४४ लावावे अशी मागणी म्हसा ग्रामपंचायतीने यंदा केली आहे. मुरबाड-कर्जत मार्गावर मुरबाड पासून १२ किमी,तर कर्जत पासून ४२ किमी अंतरावर असणारे म्हसा हे... Continue Reading →

ठाणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे यांची मुरबाड पंचायत समिती येथील कृषी व पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा !

मुरबाड (दि.३१) : ठाणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नेते संजयजी निमसे ‌यांनी मुरबाड पंचायत समिती येथील कृषी व पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबर चर्चा करुन त्यांना विविध योजनेतील लाभार्थी यांना लाभ मिळावा यासंदर्भात आढावा घेण्यात आला. ठाणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून विविध योजना... Continue Reading →

महालक्ष्मी देवस्थान व खंडोबा मंदिरात महाप्रसाद सोहळा संपन्न.

मुरबाड (दि.२६) : आई महालक्षी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट मुरबाड यांनी महालक्ष्मी देवस्थान व खंडोबा मंदिरात शुक्रवार दिनांक २५/१२/२०२० रोजी पूजा व महाप्रसाद आयोजीत केला होता. या पूजा व महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात भाविकानी लाभ घेतला. तसेच या कार्यक्रमासाठी आमदार श्री. किसनजी कथोरे, पंचायत समिती सदस्य अनिलजी देसले, भारतिय जनता पार्टी तालुका अधक्ष्य जयवंत सुर्यराव सर, माजी... Continue Reading →

गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या कामगारांची परिस्थिती आता चिंताजनक !

मुरबाड (दि.२६): मुरबाड मधील धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीने कोणतीहि पुर्वसुचना न देता ६५ कायमस्वरुपी कामगारांना कायमचे कामावरुन कमी केल्याने कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांनी शेवटचा पर्याय म्हणून कंपनीच्या गेटसमोर, आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा कालचा पाचवा दिवस असून उपोषणकर्त्या कामगारांची प्रकृती आता अतिशय चिंताजनक बनली आहे. गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started